आळेफाटा बाजारात काळीमैना विक्रीसाठी दाखल

आळेफाटा बाजारात काळीमैना विक्रीसाठी दाखल

आळेफाटा, ता. ६ : माळशेज घाटाच्या डोंगरदऱ्यातील आंबटगोड असलेली काळी मैना, रानमेवा आळेफाटा शहरात विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे.

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, उंचखडक, आळे गावातील मांडवदरा तर आणे पठारावरील नळावणे, गुळुंचवाडी या ठिकाणी तर तालुक्याच्या पश्चिम भागातील माळशेज घाट, खिरेश्वर, सीतेवाडी, हरिश्चंद्र गड डोंगराळ भागात करवंदांच्या जाळी आहेत.
स्थानिक नागरिक दरवर्षी रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता रानात फिरून काटेरी जाळीत शिरून काळी मैना गोळा करतात. गावोगावच्या आठवडे बाजारात येऊन विक्री करतात.

आळेफाटा या ठिकाणी तर माळशेज घाटातील स्थानिक ग्रामस्थ करवंदे घेऊन विकण्यासाठी येत असतात. येथील स्थानिक व्यापारी यांच्याकडून खरेदी करून थेट शहरात निभाव पद्धतीने देतात. तर काहीजण दारोदारी, बाजारात जाऊन विकतात. यामध्ये २०० ते २५० रुपये प्रती किलोनेही करवंदांची विक्री केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com