Thur, Sept 28, 2023

आळेफाटा येथील उपबाजारामध्ये १६ हजार कांदा पिशव्यांची आवक
आळेफाटा येथील उपबाजारामध्ये १६ हजार कांदा पिशव्यांची आवक
Published on : 6 May 2023, 9:48 am
आळेफाटा, ता.६ : आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात शुक्रवारी (ता.५) कांद्याच्या १६०३५ कांदा पिशव्यांची आवक झाली. बाजारात एक नंबर कांद्यास दहा किलोला ११५ रुपये बाजारभाव मिळाला आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर सुपर गोळा कांद्यास दहा किलोस १०० ते ११५ रुपये बाजारभाव मिळाला होता. तसेच एक नंबर कांद्यास ८० ते १०० बाजारभाव मिळाला. दोन नंबर कांद्यास ७० ते ९० रुपये बाजारभाव मिळला. तर तीन नंबर कांद्यास दहा किलोस ४० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस २० ते ५० रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस २० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच मीडियम कांद्यास दहा किलोस ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला आहे.