राजुरी येथे बिबट्याकडून
शेळ्या, कोंबड्या फस्त

राजुरी येथे बिबट्याकडून शेळ्या, कोंबड्या फस्त

आळेफाटा, ता. ८ : राजुरी (ता. जुन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या.
राजुरी येथील आबाटेक मळ्यात राहत असलेले मनेश दगडू कणसे यांचा शेळी व कोंबड्या पालनाचा व्यवसाय आहे. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला असता ते त्या ठिकाणी गेले असता बिबट्याने दोन शेळ्या मारून टाकल्या होत्या व तिसऱ्या शेळीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्यांनी मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने पळ काढला.
या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून, गोठ्याच्या बाजूलाच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातून पंधरा कोंबड्यादेखील बिबट्याने फस्त केल्या आहेत. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी संतोष साळुंखे, त्रिबंक जगताप, स्वप्नील हाडवळे यांनी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, राजुरी येथे दोनच दिवसांपूर्वी जावेद पटेल या शेतकऱ्याचा बोकड बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढतच चालले असून, या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com