समाज सेवा करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाज सेवा करणाऱ्या 
सेवाभावी संस्थांचा सन्मान

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उपक्रम
समाज सेवा करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उपक्रम

समाज सेवा करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा उपक्रम

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १३ ः ‘‘ग्राहकांचे हित डोळ्यांसमोर ठेवून बिंदुमाधव जोशी यांनी सुरू केलेल्या ग्राहक चळवळीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’’ असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांची केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्य सेनानी आदरणीय ग्राहक तीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या आठव्या पुण्यस्मरणार्थ पुणे जिल्हा व जुन्नर तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने सामाजिक उपक्रमशील दिन दरवर्षी साजरा केला जातो. अन्नपूर्णा संस्था आळे, संकल्प बहुउद्देशीय अन्नपूर्णा युवा संस्था केंद्र राजुरी, स्वप्नवेद संस्था मंगरूळ संस्था व तसेच सेवाभावी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कार्य गौरव सोहळा आळेफाटा येथे आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी बळवंत महाराज औटी, ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्टाचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, नेताजी डोके, सुरेखा वेठेकर, राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, एम. डी. घंगाळे, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, पुणे जिल्हा महिला प्रमुख वैशाली असले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक भास्कर गाडगे, तुषार वामन, देविदास काळे आदी उपस्थितीत होते.
बाळासाहेब औटी यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, तालुका संघटक शैलेश कुलकर्णी, महिला संघटक कौशल्याताई फापाळे, तालुका कोषाध्यक्ष देवराम तट्टू, मंदा पोटे, संतोष नेहरकर, नंदाराम भोर, रंजना डुमरे, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वैशाली अडसरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अर्चना कवडे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक भोर यांनी आभार मानले.