आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद
आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद

आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १८ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट व संतवाडी कोळवाडी व अगस्ती ऋषी गुरुकुल आळंदी यांच्या वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरास ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, एकनाथ कुऱ्हाडे, संजय शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, म्हतुजी सहाणे, चारूदत्त साबळे, विलास शिरतर, अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, व्यवस्थापक कान्हू पाटील, गिरीश कोकणे, ॲड. सुदर्शन भुजबळ, संजय खंडागळे, महेंद्र गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले, नेताजी डोके, जालिंदर गागरे, गणेश कुऱ्हाडे, शिवाजी कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, अरुण गुंजाळ अक्षय महाराज बोडके, मोहन महाराज कुरकुटे, युवराज महाराज सुकाळे उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थांना भजन, हरिपाठ, पेटी वाजवणे, पखवाज वाजवणे यांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आरोग्य, मुल्य शिक्षण, मनोरंजन, यांचे शिक्षण देण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले, तर आभार किशोर महाराज धुमाळ यांनी मानले.