सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज, इस्रो मॅजिका यांच्यात सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज, इस्रो मॅजिका यांच्यात सामंजस्य करार
सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज, इस्रो मॅजिका यांच्यात सामंजस्य करार

सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेज, इस्रो मॅजिका यांच्यात सामंजस्य करार

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १९ : राजुरी (जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि इस्रो मॅजिका यांच्या सहकार्याने कॉलेज कॅम्पसमध्ये प्रयोगशाळा स्थापन केली आहे. इस्रो मॅजिकाच्या देखरेखीखाली रॉकेट तयार करण्याची आणि त्यांना अंतराळात सोडण्याची प्रक्रिया शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना अंतराळ क्षेत्रातील शिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देशाने ही लॅब अंतराळ, खगोलशास्त्र, रॉकेट्री आणि संबंधित क्षेत्रातील विविध पैलूंमधील ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव मिळविण्यासाठी एक शैक्षणिक व्यासपीठ म्हणून काम करणार आहे.
हा सामंजस्य करार इस्रो मॅजिका चे योगेश उंडे, सीईओ प्रवीण वाकोडे, युवराज लाम्बोळे, महाविद्यालयाचे अध्यक्ष व्ही. आर. दिवाकरण संचालक गणपत कोरडे, खजिनदार किशोर पटेल, संचालक डॉ. कर्झन भानुशाली, संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य एस. बी. झोपे, उपप्राचार्य पी. बालारामडू यांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. बालारामडू यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नीलिमा शिर्के यांनी केले .