आळेफाटा स्थानकावर
चोरी करणाऱ्यांना अटक

आळेफाटा स्थानकावर चोरी करणाऱ्यांना अटक

आळेफाटा ता. २४ : आळेफाटा परिसरातील एसटी स्थानकावर चोरी करणाऱ्या टोळीस आळेफाटा पोलिसांनी अटक केली.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी माहिती दिली की, आळेफाटा येथील बसस्थानकात १ नोव्हेंबर २२ रोजी छाया हरिश्चंद्र थोरात (रा. कळंब, ता. आंबेगाव) या बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ३ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व १ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण १ लाख ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला होता.
त्याच्या अनुषंगाने पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून आरोपीचे मोबाईल नंबर मिळवले. त्याच्या तांत्रिक विश्लेषणानंतर हे आरोपी बिडकॉन (ता. पैठण, जि. संभाजीनगर) येथील असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ त्या ठिकाणी पोलिस पथक रवाना करून गुन्ह्यातील आरोपी बबन आनंदा भोसले (वय २७) यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, माझी साथीदार मंजू आनंदा भोसले (रा. सारोळा कासार, जि. नगर) हिच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. तिला नगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरलेल्या सोन्याचे दागिने वितळून त्याची १७ तोळे वजनाची ८ लाख ५० हजार रुपये किमतीची लगड बनवून राहत्या घरात लपवून ठेवल्याची कबुली दिली. या आरोपींना अटक केली आहे.
ही कामगिरी पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांची दिलेल्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर, नरेंद्र गायकवाड, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नविन अरगडे, हनुमंत ठोबळे, प्रशांत तांगडकर, दीपाली फटांगरे यांची केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com