ज्ञानमंदिर शाळेचा निकाल ९३.२२ टक्के

ज्ञानमंदिर शाळेचा निकाल ९३.२२ टक्के

आळेफाटा, ता. २६ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ९३.२२ टक्के लागला. यामध्ये कला विभागात शिवानी थिटमे (४७५ गुण), तनुजा भद्रिगे (४६३ गुण) अव्वल ठरल्या. तर, वाणिज्य विभागात गौरी वामन (४९५ गुण), तनुजा डुकरे (४७५ गुण), सुयश कुऱ्हाडे (४७० गुण) यांनी चांगले यश मिळविले. वाणिज्य शाखेच्या इंग्रजी विभागात आर्या हाडवळे (५७९ गुण), भक्ती वाजे (५७४ गुण), देविका आयनीपुल्ली (५५९ गुण) यांनी यश संपादन केले.

विज्ञान विभागात अविष्कार जाधव (५५० गुण), अवधूत धावडे (५३१ गुण), अनुजा डावखरे (५१७ गुण) मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, भाऊदादा कुऱ्हाडे, संचालक किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, प्राचार्य संदीप भवारी यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com