Tue, October 3, 2023

ज्ञानराज शाळेचा
निकाल १०० टक्के
ज्ञानराज शाळेचा निकाल १०० टक्के
Published on : 25 May 2023, 5:00 am
आळेफाटा, ता. २५ : आळे येथील ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठाण संचलित ज्ञानराज इंग्लिश मीडियम शाळेचा बारावीचा विज्ञान शाखा निकाल १०० टक्के लागला असून, यामध्ये सेफिया अन्सारी (८४.१७ टक्के), सिद्धी गोर्डे (८०.६७ टक्के), निखिल तांबे (७८.५०टक्के), काजल साखरे (७८ टक्के) यांनी चांगली गुण मिळवले असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नेताजी डोके, नयना डोके, डॉ. ज्योती पवार, सचिव दिलीप वाव्हळ, माऊली कुऱ्हाडे, धनंजय काळे, प्रसन्न डोके, सुधीर वाव्हळ, ॲड. दतात्रेय भागवत, सुरेश गडगे, पांडुरंग वाघचौरे, दीपक कुऱ्हाडे, सुरेश शिंदे, प्रदीप देवकर, सुनील जाधव यांनी अभिनंदन केले.