
आळे येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान
आळेफाटा, ता. २७ : आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेत तीनही विभागात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये समिक्षा पटाडे, शिवाणी थिटमे, तनुजा भद्रिगे, गौरी वामन, तनुजा डुकरे, सुयश कुऱ्हाडे, आर्या हाडवळे, भक्ती वाजे, देविका आयनीपुल्ली, आविष्कार जाधव, अवधूत धावडे, अनुजा डावखर या विद्यार्थांचा संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, भाऊ दादा कुऱ्हाडे, संचालक किशोर कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे, प्राचार्य संदीप भवारी आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कुऱ्हाडे यांनी केले तर आभार गोपीनाथ औटी यांनी मानले.