आळेफाटा येथील महिलेच्या
प्रामाणिकपणाचे कौतुक

आळेफाटा येथील महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

आळेफाटा, ता. २७ : एसटी बसमध्ये सापडलेला मोबाईल व रक्कम महिलेने प्रामाणिकपणे संबंधितांना परत केली.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मंदा भागूजी शिंदे या डोळे तपासण्यासाठी मंचर (ता. आंबेगाव) येथे गेल्या होत्या. तेथील दवाखान्यातील काम आटोपल्यानंतर त्या परत घरी येण्यासाठी पुणे-नाशिक या एसटी बसमध्ये बसल्या. त्यानंतर आसनाखाली मोबाईल व मोबाईलच्या कव्हरमध्ये काही रक्कम त्यांना सापडली. त्यांनी आळेफाटा येथे आल्यानंतर याची माहिती आपला मुलगा वसंत शिंदे यास दिली. त्यांनी पाहिले असता सापडलेल्या मोबाईलवर अनेक कॉल आले होते. त्यावर संपर्क केला असता थोरांदळे येथील महिलेचा तो मोबाईल असल्याचे समजले. त्यानंतर शिंदे यांनी स्वतः संबंधित महिलेच्या घरी जाऊन मोबाईल व रक्कम परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com