राजुरी येथे कारभारी औटी यांचा शताब्दी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथे कारभारी औटी यांचा शताब्दी सोहळा
राजुरी येथे कारभारी औटी यांचा शताब्दी सोहळा

राजुरी येथे कारभारी औटी यांचा शताब्दी सोहळा

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २९ ः राजुरी (ता. जुन्नर)येथील कारभारी गबाजी औटी (गुरुजी) यांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले, ‘‘गुरूवर्य औटी गुरुजींनी अनेक विद्यार्थी घडवले असून आज मोठया पदावर काम करत आहेत. राजुरी गावच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
अनेक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अनिल गुंजाळ, आशा बुचके, नारायण औटी, दीपक औटी, वैभव तांबे, शरद लेंडे, माऊली खंडागळे, पांडुरंग गाडगे, कुंडलिक हाडवळे, प्रिया हाडवळे, माऊली शेळके, नेताजी डोके, अशोक सोनवणे, एस. आर. शिंदे, निवृत्ती महाराज जगदाळे, बाळासाहेब औटी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव मालुसकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य जी. के. औटी यांनी केले. आभार अशोक औटी यांनी मानले.