टॉवरच्या बांधकामाचे काम पाडले बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॉवरच्या बांधकामाचे काम पाडले बंद
टॉवरच्या बांधकामाचे काम पाडले बंद

टॉवरच्या बांधकामाचे काम पाडले बंद

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ८ : बाभळेश्वर-कडूस कडे (मुंबई)जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या ४०० केव्ही अतिउच्च वाहिनीच्या टॉवरच्या बांधकामाचे काम आज (ता. ८) शेतकऱ्यांनी बंद पाडले. बाभळेश्‍वर येथून टॉवर होऊ नये यासाठी गेल्या १० वर्षांपासून राजगुरुनगर येथील जिल्हा सत्र न्यायलयप्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्रकरणी शेतकरी कोर्टात दाद मागत आहेत.
जमिनींच्या वेळोवेळी होणाऱ्या भूसंपादनास शेतकरी कंटाळले आहेत. या अगोदर पिंपळगाव जोगा कालवा तसेच त्याच्या चाऱ्या, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे संपादन, रस्ते महामार्ग रुंदीकरण यासाठी वेळोवेळी संपादन होत आहे. त्यात टॉवर लाइनचे भूसंपादन न परवडणारे आहे. तरी याबाबत येथील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले होते.
यावेळी भाजप गटनेत्या आशा बुचके, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, आळेचे उपसरपंच ॲड. विजय कुऱ्हाडे, मंगेश अण्णा काकडे, गणेश गुंजाळ, अरुण हुलवळे, अविनाश कुऱ्हाडे, जयराम भुजबळ, गणेश शिंदे, राहुल तितर, सुजित कु-हाडे, नीलेश भुजबळ, परशुराम कुऱ्हाडे, शरद आरोटे, संजय गुजाळ, संजय कुऱ्हाडे, संजय हुलवळे, सुरेखा हुलवळे, कमल हुलवळे, मनीषा हुलवळे, सीमा हुलवळे, संगीता हुलवळे, रेखा हुलवळे, अजिंक्य हुलवळे संदीप हुलवळे, कारभारी हलवळे, गेनभाऊ हुलवळे, प्रकाश हुलवळे आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी महापारेषणतर्फे उच्च पदस्थ अभियंते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, आळेफाटा पोलिस निरीक्षक नलावडे, ओतूर सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे व पोलिस फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय येता सोमवारी बैठक
बाभळेश्वर परिसरातून जवळपास २७ जणांच्या शेतातून जाणारे हे हाय व्हॉलटेज लाइनच्याकामासाठी भूसंपादन होत आहे. मात्र हे भूसंपादन शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढीव मोबदला जरी मिळाला करू द्यायचे नाही असा पवित्रा संतप्त पीडित शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला. शेतकऱ्यांचा वाढता विरोध पाहता तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी (ता. १२) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे पीडित शेतकरी, महापारेषण अधिकारी यांची समन्वयक बैठकीचे तातडीने आयोजन केले आहे.

पीडित शेतकऱ्यांच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे व आळे गाव उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांनी महापारेषणच्या उच्च पदस्थ अभियंत्यांना नव्याने सर्वेक्षण केलेल्या बागायती शेतीचे भूसंपादन न करता जुन्या सर्व्हे झालेल्या कोरडवाहू शेतातून भूसंपादन करण्याचे आवाहन केले आहे. त्यात ४०० केव्ही अति उच्च वाहक विद्युतवाहिनी करण्यात यावी, अशी आम्ही ठाम भूमिका घेतली आहे. रेडिकनेटर दराच्या १० पट मोबदला जरी दिला तरी भूसंपादन होऊ देणार नाही.
- ॲड. विजय कुऱ्हाडे, उपसरपंच, आळे

02955