जुन्नरमधील बंधारे दुरुस्तीसाठी निधीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमधील बंधारे दुरुस्तीसाठी निधीची मागणी
जुन्नरमधील बंधारे दुरुस्तीसाठी निधीची मागणी

जुन्नरमधील बंधारे दुरुस्तीसाठी निधीची मागणी

sakal_logo
By

बेल्हे, ता. १० : जुन्नर तालुक्यातील कुकडी व मीना नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी नुकतीच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक विलास राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात मीना व कुकडी नदीवर २५-३० वर्षांपूर्वी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. सदर बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून केली जात आहे. यामध्ये अनेक बंधाऱ्यांचे ढापे बदलणे, रेलिंग दुरुस्त करणे, बंधाऱ्यावरील रस्त्याच्या कडेची माती काढून खड्डे सिमेंट काँक्रेटने बुजविणे आदी मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत.
कुकडी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे व कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे निधी उपलब्ध करण्याची मागणी आमदार बेनके यांनी केल्याचे पवार यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01550 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top