आणे पठारासाठी उपसासिंचन योजना राबवा ः भोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणे पठारासाठी उपसासिंचन योजना राबवा ः भोर
आणे पठारासाठी उपसासिंचन योजना राबवा ः भोर

आणे पठारासाठी उपसासिंचन योजना राबवा ः भोर

sakal_logo
By

बेल्हे, ता. २१ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील गावांना शेतीच्या पाण्यासाठी कुकडी प्रकल्पातून उपसासिंचन योजना राबविण्याचा दृष्टीने सर्वेक्षणासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ''कसम'' चळवळीचे प्रणेते जगन्नाथ भोर यांनी केले.
आणे येथील बैठकीत बोलताना भोर म्हणाले, ‘‘आणे पठार भागावर शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी शासनाच्या जलसंपदा खात्याशी पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. कुकडीच्या पाण्यावर आपला हक्क असून या हक्कासाठी प्रसंगी आंदोलनही करू. सह्याद्रीच्या कुशीत नदीखोऱ्यांचा उगमाजवळ पश्चिमेकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे वळवून कुकडी योजनेत आणणे व वंचित भागाला ते उपलब्ध होण्यासाठी जनआंदोलनाचा रेटा उभारावा लागेल.’’ यावेळी बाळासाहेब दाते, मधुकर दाते यांनी पठारावरील पाण्यासाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केला. याप्रसंगी पठार विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष शिंदे, सचिव विराज शिंदे, मुक्ता दाते, गोरख शिंदे, तुषार आहेर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01553 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..