समर्थ पॉलिटेक्निकला उत्कृष्ट कामकाजाबद्दल एन.बी.ए. मानांकन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ पॉलिटेक्निकला उत्कृष्ट कामकाजाबद्दल  एन.बी.ए. मानांकन
समर्थ पॉलिटेक्निकला उत्कृष्ट कामकाजाबद्दल एन.बी.ए. मानांकन

समर्थ पॉलिटेक्निकला उत्कृष्ट कामकाजाबद्दल एन.बी.ए. मानांकन

sakal_logo
By

बेल्हे, ता. १३ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ पॉलिटेक्निक या तंत्रनिकेतन महाविद्यालयास, नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीशन (एन.बी.ए.) समितीकडून उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन २०२५ पर्यंत एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाले आहे.
बेल्हे येथील समर्थ पॉलिटेक्निक हे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एन. बी. ए. मानांकन प्राप्त पहिले खासगी तंत्रनिकेतन आहे. याठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडीशन (एन.बी.ए.) समितीकडून पाहणी करण्यात आली. त्यांनी निर्माण केलेल्या मानांकनानुसार एन. बी. ए. कडून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांचे मुल्यांकन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
समितीने समर्थ पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली. तीन दिवसामध्ये समितीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, रिसर्च ऍण्ड कन्सल्टन्सी, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांचा फिडबॅक, आउट कम बेस्ड एज्युकेशन, सीओ-पीओ मॅपींग, प्लेसमेंट याचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर कार्यशाळा, ग्रंथालय, अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, ऑफीस, जिमखाना, कॅन्टीन, क्रीडा विभाग, मुलांनी केलेले प्रोजेक्ट, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व सायन्स विभागाचे लॅब आणि तेथील कागदपत्रांची तपासणी केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01564 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top