
मंगरूळ परिसरामध्ये पावसामुळे पिकाचे नुकसान
बेल्हे, ता. २८ : मंगरूळ (ता. जुन्नर) परिसरात रविवारी (ता.२६) सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
मंगरूळ, झापवाडी तसेच साकोरी परिसरात रविवारी (ता.२६) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. यामुळे उभ्या पिकात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. संजय खिलारी, कुंडलिक नढे, राजाराम नलावडे, संभाजी गोरे यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले. यामुळे साठवलेला कांदा भिजून मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे शेताचे बांध फुटून माती वाहून गेली. शेतकऱ्यांचे फ्लॉवर, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. झापवाडी येथील एका शेतकऱ्याच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य भिजले. याठिकाणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरद माळी आदींनी, सोमवारी (ता.२७) प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना आमदार अतुल बेनके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01575 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..