शेतकरी महिला बनणार कृषी उद्योजक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी महिला बनणार कृषी उद्योजक
शेतकरी महिला बनणार कृषी उद्योजक

शेतकरी महिला बनणार कृषी उद्योजक

sakal_logo
By

बेल्हे, ता.२३ : येथे (ता. जुन्नर) बँक ऑफ इंडियाच्या ''शेतकरी महिना'' उपक्रमाअंतर्गत, नुकताच ''शेतकरी महिला उद्योजकता विकास मेळावा'' आयोजित केला होता. यावेळी बँक ऑफ इंडियाच्या अर्थसहाय्यातून शेतकरी महिला बचत गटांना कृषी उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

बेल्हे येथे बँक ऑफ इंडियाच्या वतीने महावीर भवन मध्ये (ता.१९) आयोजित शेतकरी महिला उद्योजकता विकास मेळाव्यात, परिसरातील जवळपास ६० हून अधिक बचत गटांतील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमप्रसंगी बँकेचे पुणे विभाग व्यवस्थापक शिबा प्रसाद बिस्वाल, जिल्हा व्यवस्थापक (वित्तीय समावेशन) श्रीमती सोनाली अवचट, वरिष्ठ शाखा प्रबंधक ललितकुमार काळे, जिल्हा उद्योग निरिक्षक चंद्रभान गोहाड, पंचायत समितीच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियानाच्या तालुका व्यवस्थापक उषा अभंग, प्रभाग व्यमन्वयक निर्मला गाढवे, कृषी उद्योजक गणेश हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी उद्योग विस्तारासाठीच्या योजना, अर्थसहाय्य आणि यशस्वी व्यवसायाची सुत्रे आदी विषयी अधिकारी व तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी गटांना बँकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. बिस्वाल यांनी यावेळी दिली.
यावेळी किसान क्रेडिट कार्ड, किसान तात्काळ योजना, स्टार किसान वाहन, सोने तारण योजना, वैयक्तिक आणि सामुहिक सुरक्षा योजना, अटल पेंशन योजना याविषयी महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विवेक मंडलिक यांनी प्रास्ताविक, सत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि इतर विविध लघुउद्योग योजनांची माहिती गोहाड यांनी दिली. बँक ऑफ इंडियाची बेल्हे शाखा ५० वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत असून, शेती व शेती संलग्न उद्योजकता विकास यासाठी बँकेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
- लालीतकुमार काळे, शाखा प्रबंधक


01495

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01587 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..