एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापनाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापनाची गरज
एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापनाची गरज

एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापनाची गरज

sakal_logo
By

बेल्हे, ता. २९ : मका पीक पेरते वेळेस रासायनिक बीजप्रक्रिया करावी. बियाण्याची लागवड झाल्यानंतर बी उगवण्याच्या आत, एकरी पाच कामगंध सापळे वापरून एकात्मिक पद्धतीने लष्करी आळीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे मत नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी व्यक्त केले.

पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथे रामवाडी परिसरात नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत, शेतकऱ्यांसाठी मका पिकावरील एकात्मिक लष्करी आळी नियंत्रणाविषयीचे एक दिवसीय ''शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम'' आयोजित केला होता. यावेळी गावडे यांनी ''मका पिकावरील एकात्मिक लष्करी आळी नियंत्रण'' याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी प्रगतशील शेतकरी बाळासाहेब डेरे, दत्तात्रेय येवले, तुकाराम भोर, विष्णू शिंदे, सचिन भोर, अंकुश येवले, बबन येवले, किरण येवले, राहुल येवले, सुरेश येवले, गणेश भोर, सुखदेव येवले, कृष्णकांत डेरे तसेच मोठ्या संख्येने मका उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यावेळी गावडे म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात चारा पीक, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न व मका बियाणे म्हणून मका पिकाची लागवड केली जाते. परंतु मागील चार-पाच वर्षापासून या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. मका पिकावरील या किडीच्या नियंत्रणासाठी मका पीक पेरते वेळेस थायरम व कार्बेन्डाझिम या रासायनिक बीज प्रक्रिया करून पेरणी किंवा लागवड करावी.
यावेळी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन दत्ता येवले यांनी केले.

01506

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01593 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..