मंगरूळमध्ये बिबट्याकडून ७ जनावरे फस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगरूळमध्ये बिबट्याकडून ७ जनावरे फस्त
मंगरूळमध्ये बिबट्याकडून ७ जनावरे फस्त

मंगरूळमध्ये बिबट्याकडून ७ जनावरे फस्त

sakal_logo
By

बेल्हे, ता. २९ : मंगरूळ (ता. जुन्नर) येथील श्रीरामनगर परिसरात बिबट्याने प्रकाश पोपट लामखडे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील पाच शेळ्या व दोन मेंढ्या अशी सात पाळीव जनावरे ठार झाली. या दोन घटना शुक्रवारी (ता.२६) व रविवारी (ता.२८) रात्री घडल्या.
श्रीरामनगर परिसरात लामखडे यांच्या घराशेजारी त्यांचा जनावरांचा गोठा आहे. या गोठ्याच्या लोखंडी जाळीच्या कंपाउंडवर चढून, बिबट्याने आत प्रवेश करून केला व ७ जनावरे ठार केली. यापैकी ६ जनावरे बिबट्याने उचलून नेऊन फस्त केली, तर एका मेंढीचे कोकरू जागेवरच ठार मारले. यामुळे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे लामखडे यांनी सांगितले. शुक्रवारी (ता. २६) बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे ठार झाल्याने, संबंधित शेतकरी प्रकाश पोपट लामखडे यांनी वनविभागाच्या मदतीने पिंजरा लावण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यासाठी आमिष म्हणून स्वतःच्या गोठ्यातील कोकरू ठेवले होते. मात्र यावेळी पिंजऱ्यात आमिष म्हणून ठेवलेले एक कोकरू बचावले. मात्र इतर एकूण ७ शेळ्या - मेंढ्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगण्यात आले. याबाबत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी यांनी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली.

मंगरूळ परिसरात बिबट्याच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वीच्या काळात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी जीवितहानीच्या घटना घडलेल्या आहेत. परिसरातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत वनविभागाने पुरेशी दखल घेणे आवश्यक असून, भविष्यात काही दुर्घटना झाली, तर त्याला जबाबदार वनविभाग राहील, असे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01609 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..