बेल्ह्यातील मिरवणुकीत महिलांचा सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्ह्यातील मिरवणुकीत महिलांचा सहभाग
बेल्ह्यातील मिरवणुकीत महिलांचा सहभाग

बेल्ह्यातील मिरवणुकीत महिलांचा सहभाग

sakal_logo
By

बेल्हे, ता. १० : बेल्हे (ता. जुन्नर) परिसरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. यावेळी भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
बेल्हे येथे क्रांतिवीर उमाजी नाईक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग होता. मोरया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. दरम्यान श्री पोळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचे सातव्या दिवशीच उत्साहात गणेश विसर्जन करण्यात आले. येथील श्री मारुती मंदिराजवळील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने उत्साहात काढण्यात आली. श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरात यंदा गणेश विसर्जन मिरवणूक झाली. गणेश विसर्जन मिरवणुकांचे ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत केले जात होते. दरम्यान शिंदेमळा येथील श्री सावतामाळी महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पारंपरिक पद्धतीने टिपऱ्या खेळत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01614 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..