आणेत जिल्हा दूध संघातर्फे मोफत लसीकरणाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणेत जिल्हा दूध संघातर्फे मोफत लसीकरणाचा  प्रारंभ
आणेत जिल्हा दूध संघातर्फे मोफत लसीकरणाचा प्रारंभ

आणेत जिल्हा दूध संघातर्फे मोफत लसीकरणाचा प्रारंभ

sakal_logo
By

बेल्हे, ता. १४ : आणे (ता. जुन्नर) येथे आज (ता. १४) पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने बैल व गाय वर्गीय जनावरांना लम्पी स्किन या संसर्गजन्य आजारापासून वाचविण्यासाठी, पुणे जिल्ह्यात संघाला जोडलेल्या दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून १०० टक्के अनुदानावर ''मोफत लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ'' जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक बाळासाहेब खिलारी यांच्या हस्ते करण्यात आला.
आणे येथे नवनाथ दाते या शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाय वर्गीय जनावरांचे १०० टक्के लसीकरण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, ज्ञानेश्वर संभेराव, प्रशांत दाते, बाळासाहेब दाते, संतोष दाते, बाबाजी दाते, पशुवैद्यक रोहन दाते, प्रदीप आहेर तसेच बलराम सहकारी दूध उत्पादक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. बेल्हेकर व डॉ. भगत यांनी लम्पी स्किन आजाराविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. लम्पीच्या संकटापासून दूध उत्पादक शेतकऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाला जोडलेल्या गावांमध्ये, संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोफत लसीकरण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे बाळासाहेब खिलारी यांनी सांगितले.

01547

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01618 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..