बेल्ह्यातील पायल हिचे सीईटी परीक्षेमध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्ह्यातील पायल हिचे
सीईटी परीक्षेमध्ये यश
बेल्ह्यातील पायल हिचे सीईटी परीक्षेमध्ये यश

बेल्ह्यातील पायल हिचे सीईटी परीक्षेमध्ये यश

sakal_logo
By

बेल्हे, ता. २० : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ ज्युनिअर कॉलेजमधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी पायल गुंजाळ हिने एमएचटी-सीईटी २०२२ परीक्षेमध्ये ९९.१५ पर्सेंटाईल गुण मिळवून यश संपादन केले आहे. यामुळे समर्थचा सीईटी परीक्षेचा समर मार्गदर्शनपर उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडू नये म्हणून, समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर व शिक्षकांनी एकत्र येऊन दैनंदिन वेळापत्रक व उन्हाळी-हिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना सीईटीचे मार्गदर्शन सुरू केले. शिक्षक व विद्यार्थी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे समर्थच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. वृषाली शिंदे - ८९.७२ (पीसीएम), ८३.६० (पीसीबी), स्नेहल गवारी ८३.९४ पर्सेंटाईल (पीसीबी) याही विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी केलेली आहे. या वर्षीसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेमध्ये प्रविष्ट होऊन चांगले गुण संपादन करावेत, यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे प्रा. विनोद चौधरी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना प्रा. विनोद चौधरी, प्रा. अमोल खामकर, प्रा. रोहिणी औटी, प्रा. नूतन पोखरकर, प्रा. शुभांगी सोळसे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, खजिनदार तुळशीराम शिंदे, विश्वस्त वल्लभ शेळके, प्रा. राजीव सावंत, मेहबूब काझी, अरिफ आतार, संतोष पाटे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Alp22b01624 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..