समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये पॅरामेडीकल अभ्यासक्रमास मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये
पॅरामेडीकल अभ्यासक्रमास मान्यता
समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये पॅरामेडीकल अभ्यासक्रमास मान्यता

समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये पॅरामेडीकल अभ्यासक्रमास मान्यता

sakal_logo
By

बेल्हे, ता. १२ : समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेला पदवीनंतरचा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम ‘ऍडव्हान्स डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ शैक्षणिक संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी ही माहिती दिली.
बी. एस्सी केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी (गणित व भौतिकशास्त्र सोडून), बी. एस्सी फिजिओथेरपी, बी. फार्मसी, बीव्हीएस्सीसी, बीएएमएस, बीयुएमएस, एमबीबीएस, डीएचएमएस किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रक्त, लघवी तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी नोंदणीकृत परवाना प्राप्त होतो. प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सहाय्यक अभदा तंत्रज्ञ म्हणून, खाजगी किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये प्रयोग शाळा सहाय्यक, पर्यवेक्षक म्हणून किंवा विषाणू संशोधन संस्थांमध्ये रक्तपेढी, लस उत्पादन संस्था, फार्मास्यूटिकल्स कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध होऊ शकणार असल्याचे प्रा. राजीव सावंत यांनी सांगितले.