Sun, Feb 5, 2023

छबूबाई फुलसुंदर यांचे निधन
छबूबाई फुलसुंदर यांचे निधन
Published on : 18 October 2022, 8:57 am
बेल्हे, ता. १८ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील छबूबाई बाळाजी फुलसुंदर (वय ९९) यांचे नुकतेच निधन झाले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धर्माजी फुलसुंदर, मुंबई दूरदर्शनचे माजी सहसंचालक शिवाजी फुलसुंदर, मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी रामदास फुलसुंदर, खादी ग्रामोद्योग मंडळातील अधिकारी ज्ञानेश्वर फुलसुंदर, प्रगतशील शेतकरी महादू फुलसुंदर हे त्यांचे पुत्र होत. तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व सावतामाळी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद फुलसुंदर हे त्यांचे नातू होत.