साकोरी -पुणे एसटी गाडी नियमित सुरू ठेवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकोरी -पुणे एसटी गाडी
नियमित सुरू ठेवण्याची मागणी
साकोरी -पुणे एसटी गाडी नियमित सुरू ठेवण्याची मागणी

साकोरी -पुणे एसटी गाडी नियमित सुरू ठेवण्याची मागणी

sakal_logo
By

बेल्हे, ता. २८ : साकोरी -पुणे एसटी गाडी वारंवार बंद करण्यात येत असल्यामुळे, पुणे शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, ही बससेवा दररोज नियमितपणे सुरू ठेवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

सणासुदीचे दिवस, उन्हाळी हंगाम, तसेच गर्दीच्या वेळी विविध कारणे दाखवून, वेळोवेळी ही बस सेवा बंद ठेवण्यात येत आहे. ही एसटी बस सेवा नारायणगाव आगारास चांगले उत्पन्न देत होती. प्रवासी वर्गसुद्धा सकाळी पुण्याकडे जाण्यासाठी या बस सेवेवर अवलंबून होता. मात्र केव्हाही ही सेवा खंडित केली जात असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने ही
गाडी बेभरवरशाची ठरत आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील बेल्हे व परिसरात नारायणगाव आगाराच्या पुणे- साकोरी, नारायणगाव-झापवाडी, नारायणगाव-म्हस्केवाडी या फक्त तीन एसटी बस मुक्कामी असतात. यापैकी पुणे- साकोरी एसटी गाडी उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर असूनसुद्धा सेवा बंद ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-----------------------------------------