कांदा लागवडीनंतर कीड व्यवस्थापन गरजेचे : गावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा लागवडीनंतर कीड व्यवस्थापन गरजेचे : गावडे
कांदा लागवडीनंतर कीड व्यवस्थापन गरजेचे : गावडे

कांदा लागवडीनंतर कीड व्यवस्थापन गरजेचे : गावडे

sakal_logo
By

बेल्हे, ता. १९ : ''कांदा पिकावर हवामान बदलामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असल्यामुळे, शेतकऱ्यांनी कांदा लागवडीनंतर पिकांना आवश्यकतेनुसार एकात्मिक पद्धतीने कीड व रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे,'' असे मत, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयक तज्ज्ञ शास्रज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे केले.

पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे रामवाडी परिसरात ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, आय.टी.सी. मिशन सुनहरा कल, डी.एस.सी. व दीपक फर्टिलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि., पुणे यांच्या वतीने, ''कांदा लागवड व्यवस्थापन व कांदा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन'' या विषयीचे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, कार्यक्रम सहायक धनेश पडवळ, आयटीसीचे नितीन चौधरी, उत्तम जाधव, दीपक फर्टिलायझरचे गणेश आवारी, आत्माचे धोंडिभाऊ पाबळे, कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रेय येवले, किरण येवले, बाळू येवले, साहेबराव भोर, उत्तम डेरे, सखाराम पिंपळे, सुखदेव येवले, शंकर भोर तसेच परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
आयटीसीचे उत्तम जाधव प्रास्ताविक तर आभारप्रदर्शन प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय येवले यांनी केले.

अशी घ्या कांदा पिकाची काळजी
१) कांदा पिकातील मर रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी रोपवाटिकेत ट्रायकोडर्मा व सुडोमोनस या जैविक बुरशीचा वापर करावा.
२) कांदा लागवडीसाठी जमीन तयार करत असताना निंबोळी खत, करंज पेंड, गांडूळ खत व शेणखताचा वापर करावा.
३) कांदा रोपवाटिका मधून येणाऱ्या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी रोपांना शिफारशीत असलेल्या रासायनिक व जैविक प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
४) पुनर्लागवड करताना जमिनीत माती परिक्षणानुसार खत देण्यात यावे.