बेल्ह्याच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गुंजाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्ह्याच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गुंजाळ
बेल्ह्याच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गुंजाळ

बेल्ह्याच्या तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी गुंजाळ

sakal_logo
By

बेल्हे, ता. २५ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित ग्रामसभेत, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी टी. एल. गुंजाळ यांची, तर उपाध्यक्षपदी सुधाकर सैद यांची निवड करण्यात आली. यापूर्वी गुंजाळ यांनी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची तीन वेळा जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात तंटामुक्त गाव समितीचे उत्कृष्ट कामकाजाबद्दलचे सुमारे सात लाख रुपयांचे बक्षीस बेल्हे गावाने पटकावले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गोरक्षनाथ वाघ यांच्या हस्ते, दोघांचाही बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.