समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाढीव तुकडीस मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाढीव तुकडीस मान्यता
समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाढीव तुकडीस मान्यता

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये वाढीव तुकडीस मान्यता

sakal_logo
By

बेल्हे, ता. १ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माण शास्त्र पदवी महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून वाढीव तुकडीसाठी नुकतीच मान्यता मिळाली, अशी माहिती प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी दिली.
विद्यार्थी व पालक वर्गाकडून सातत्याने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मागणी होत होती. त्यानुसार विद्यार्थी संख्या वाढीसाठी महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला होता. फार्मसी कौन्सिलने महाविद्यालयातील भौतिक सुविधांची पाहणी करून विद्यार्थी प्रवेश क्षमता ६० वरून १०० करण्याची परवानगी दिली. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांबरोबरच सर्वांगीण विकासासाठी सॉफ्ट स्किल, संभाषण कौशल्ये, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषद, कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना आदी विविध उपक्रम राबविले जातात.