बेल्ह्यातील बेल्हेश्वर विद्यालयात व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेल्ह्यातील बेल्हेश्वर विद्यालयात व्याख्यान
बेल्ह्यातील बेल्हेश्वर विद्यालयात व्याख्यान

बेल्ह्यातील बेल्हेश्वर विद्यालयात व्याख्यान

sakal_logo
By

बेल्हे, ता. १५ : येथील रयत शिक्षण संस्थेच्या बेल्हेश्वर विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भावी पिढीला शरदचंद्र पवार यांच्या कार्याविषयी माहिती व्हावी, यासाठी विद्यालयात ता. १२ ते ता. १८ डिसेंबर दरम्यान विविध शालेय उपक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच, कृतज्ञता सप्ताह राबविण्यात येणार आहे. या प्रसंगी उपमुख्याध्यापक पी. डी. सोनवणे, प्रमुख व्याख्याते सूर्यकांत भालेराव, संस्थेच्या पश्चिम विभाग सल्लागार समितीचे सदस्य राम बोरचटे, धोंडी पिंगट, विश्वनाथ डावखर, राजेंद्र गाडगे, सावकार पिंगट, राकेश डोळस, नाना भुजबळ, अरुण काळे, सुमीत बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी. अभंग यांनी तर, सूत्रसंचालन व्ही. बी. पांडे यांनी केले. आभार गोसावी यांनी मानले.