साकोरी येथे दुरंगी सामन्यामुळे चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकोरी येथे दुरंगी सामन्यामुळे चुरस
साकोरी येथे दुरंगी सामन्यामुळे चुरस

साकोरी येथे दुरंगी सामन्यामुळे चुरस

sakal_logo
By

बेल्हे, ता. १४ : साकोरी (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या ११ जागांसाठी शिवशक्ती ग्रामविकास पॅनेल व शिवनेर परिवर्तन पॅनेल या दोन पॅनेलमध्ये दुरंगी लढत होत आहे.
साकोरी येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथील सरपंचपदासाठी शिवशक्ती ग्रामविकास पॅनेलच्या दिव्या आशिष नेहरकर यांच्या विरोधात शिवनेर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार सुरेखा तुकाराम गाडगे यांच्यात समोरासमोर लढत होत आहे. त्या जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या आहेत.
या निवडणुकीसाठी शिवशक्ती ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व सरपंच पांडुरंग साळवे; तर शिवनेर परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच पांडुरंग गाडगे हे करीत आहेत. शिवशक्ती ग्रामविकास पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक १मधून स्वप्नील खंडू साळवे, ज्ञानेश्वर बबन चोरे, मीनाक्षी ज्ञानेश्वर भालेराव, वॉर्ड क्रमांक २मधून हौशीराम जिजाबा विश्वासराव, ज्योती गणेश बनकर, शोभा अण्णाभाऊ साळवे, वॉर्ड क्रमांक ३मधून विलास मारुती गाडगे, सविता पंडित साळवे, वॉर्ड क्रमांक ४मधून दिनकर तुकाराम वायकर, सुजाता रवींद्र वाळुंज, संगीता शरद पानसरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, त्यांच्या विरोधात शिवनेर परिवर्तन पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक १मधून उमाजी विठ्ठल साळवे, शंकर विष्णू गोफणे, सुनीता सुनील गायकवाड, वॉर्ड क्रमांक २मधून राहुल सखाराम विश्वासराव, ज्योती सुनील गाडगे, माधुरी कल्पेश साबळे, वॉर्ड क्रमांक ३मधून तुषार बाळू येवले, रतन अरुण गाडगे, तर वॉर्ड क्रमांक ४मधून प्रकाश अभिमन्यू गाडगे, कुंदा भानुदास पानसरे, मनीषा दत्तात्रेय सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.