आणे येथे सरपंचपदासाठी अपक्षही रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणे येथे सरपंचपदासाठी अपक्षही रिंगणात
आणे येथे सरपंचपदासाठी अपक्षही रिंगणात

आणे येथे सरपंचपदासाठी अपक्षही रिंगणात

sakal_logo
By

बेल्हे, ता. १६ : आणे (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनेल व श्री रंगदासस्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची रंगतदार लढत होत आहे.
आणे ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सरपंचपदासाठी श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवार प्रियांका प्रशांत दाते, श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार माजी सरपंच डॉ. श्वेतांबरी दीपक आहेर व अपक्ष उमेदवार नंदा विष्णू दाते या तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या ११ जागांसाठी दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांमध्ये दुरंगी लढत होत आहे. श्री स्वामीकृपा ग्रामविकास पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक १ मधून कुशाबा कान्ह हांडे, ज्योती अजित आहेर, पुष्पलता भास्कर आहेर, वॉर्ड क्रमांक २ मधून सुहास मुरलीधर आहेर, जयराम रंगनाथ दाते, सुनीता सुभाष दाते, वॉर्ड क्रमांक ३ मधून अनिता नितीन आहेर, शेखमेहबुब नूरमहंमद तांबोळी, वॉर्ड क्रमांक ४ मधून ज्ञानेश्वर विष्णू आहेर, प्रियांका विलास दाते, सुरेखा सुनील थोरात हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, श्री रंगदास स्वामी सर्वमान्य ग्रामविकास परिवर्तन पॅनेलकडून वॉर्ड क्रमांक १मधून संजय लक्ष्मण डोंगरे, अर्चना किशोर आहेर, वैष्णवी विनोद आहेर, वॉर्ड क्रमांक २मधून राहुल धोंडिभाऊ आहेर, विशाल प्रकाश दाते, प्रज्ञा सुरेश दाते, वॉर्ड क्रमांक ३मधून आदिनाथ अतुल गोफणे, वैशाली बकुल दाते, वॉर्ड क्रमांक ४मधून संतोष पांडुरंग दाते, रंजना सुनील दाते, लक्ष्मीबाई विकास थोरात हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.