‘उत्सव रंगांचा’ स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उत्सव रंगांचा’ स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश
‘उत्सव रंगांचा’ स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश

‘उत्सव रंगांचा’ स्पर्धेत समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

बेल्हे, ता. १० : बेल्हे (ता. जुन्नर) येथील समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी, नुकतेच मुंबई येथे आयोजित रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत ‘उत्सव रंगांचा’ या राष्ट्रीय पातळीवरील आर्ट कॉम्पिटिशनमध्ये यश संपादन केले.
बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ गुरुकुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सदर विद्यार्थ्यांनी हस्ताक्षर, चित्रकला, टॅटू मेकिंग आदी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केल्याचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सांगितले. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये सारी आहेर या विद्यार्थिनीला आर्ट मेरिट अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. वैष्णवी ढोबळे, सानिका मेहेर, श्रीनिका शेळके या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकाविले.
चित्रकला स्पर्धेत श्रीनिका शेळके हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. श्रीशैल आहेर, साहस वैद्य, परिणिता विश्वासराव, जुनेद , समृद्धी शेळके, आर्यन भांबेरे , श्रेयन औटी, अमृता पाडेकर या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यशश्री औटी, प्रणव बांगर, किमया आरोटे या विद्यार्थ्यांना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
टॅटू मेकिंग स्पर्धेत प्रिया राजदेव हिला सुवर्ण पदक तर श्रुजन शेलार हिला रौप्य पदक मिळाले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.