
मंगरूळ व पारगावतर्फे आळेला आदर्श विमा ग्राम पुरस्कार
बेल्हे, ता. १९ : मंगरूळ व पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) या दोन गावांना एलआयसी विमा कंपनीच्या वतीने, नुकताच ''आदर्श विमा ग्राम पुरस्कार'' मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देऊन स्थानिक ग्रामपंचायत सभागृहात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
मंगरूळ येथे सरपंच तारा दत्तात्रेय लामखडे यांनी तर पारगावतर्फे आळे येथे सरपंच रेश्मा बोटकर व उपसरपंच रामचंद्र डुकरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी एल.आय.सी. शाखा नारायणगावचे शाखा अधिकारी सुधीर कांत, उपशाखा अधिकारी आनंद ठाकूर, विकास अधिकारी डी. डी. डोके आदी मान्यवरांच्या हस्ते दोन्हीही गावांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, संभाजी चव्हाण, एलआयसी प्रतिनिधी नीलेश लामखडे, ग्रामसेविका श्रीमती शेंडकर, ग्रामसेवक सुनील देशमुख, विनायक लामखडे, सुनीता लामखडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक खिलारी, सुखदेव लामखडे, संपत लामखडे, पारगावच्या माजी सरपंच लता चव्हाण, माजी सरपंच देवराम तट्टू, सोसायटीचे अध्यक्ष सचिन डुकरे, किसन डुकरे, विकास चव्हाण, मोतीराम डुकरे, तुषार येवले, रामदास तट्टू, पांडुरंग डुकरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, एलआयसी प्रतिनिधी म्हणून काम पाहणाऱ्या व सहा वेळा एलआयसीचा एमडीआरटी पुरस्कार मिळवलेल्या नीलेश लामखडे यांचे पुरस्कार मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगण्यात आले.
01738