
वळसे पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेल्हे, ता. ३ : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वळसे पाटील महाविद्यालयात घोडेगावच्या बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी भाषा आणि महाविद्यालयीन युवक’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव होत्या.
महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वाल्हेकर यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांची ओळख व त्यांची भेट आणि आठवणींना यावेळी उजाळा दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी साहित्य लेखनाकडे वळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रल्हाद शिंदे, प्रा. अनिल पडवळ, डॉ. शकुराव कोरडे, प्रा. नंदा आहेर, प्रा. शीतल कांबळे, प्रा. मंगल उनवणे, प्रवीण गोरडे आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद शिंदे यांनी, सूत्रसंचालन ज्योती गायकवाड यांनी केले. तर आभार आशिष घाडगे यांनी मानले.