निमगाव सावा येथे पिकांना गारांच फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगाव सावा येथे
पिकांना गारांच फटका
निमगाव सावा येथे पिकांना गारांच फटका

निमगाव सावा येथे पिकांना गारांच फटका

sakal_logo
By

बेल्हे, ता. १८ : निमगाव सावा (ता. जुन्नर) परिसरात शनिवारी (ता. १८) दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना गारांचा फटका बसल्याने काही प्रमाणात नुकसानीस सामोरे जावे लागले. यावेळी काही ठिकाणी लहान आकाराच्या गारांचा खच पडल्याचे चित्र दिसून येत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या फळे व भाजीपाला पिकांना गारांचा फटका बसला. आंब्याचा मोहोर गळून पडला, तर कैऱ्यांना गारांचा फटका बसला. शेतातील कलिंगडाच्या फळांना गारांचा फटका बसल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याचे संदीप पवार यांनी सांगितले.