विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा
विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा

विद्यार्थ्यांनी दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा

sakal_logo
By

बेल्हे, ता. २३ : ‘‘विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. यशवंत होण्यासाठी विवेक बुद्धी व सकारात्मकता या गोष्टीची अत्यंत गरज आहे. शिक्षणाचा उद्देश नोकरी नसून, विद्यार्थ्यांना समाजाभिमुख व सजग करणे, चांगल्या-वाईटाची जाणीव करून देणे हा आहे,’’ असे प्रतिपादन नारायणगावच्या महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. अनिल काळे यांनी केले.
निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळाच्या वतीने नुकतेच डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. काळे यांचे ‘आजच्या युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी डॉ. काळे बोलत होते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, अध्यक्ष संदीपान पवार, सचिव परेश घोडे, खजिनदार किशोर घोडे, संचालक भाऊ थोरात, प्रा. प्रल्हाद शिंदे, डॉ. दत्तात्रेय चव्हाण, प्रा. मंगल उनवणे, प्रा. प्रवीण गोरडे, प्रा. नंदा आहेर, प्रा. माधुरी भोर, प्रा. सुभाष घोडे, प्रा. आशिष गाडगे, प्रा. प्रियंका डुकरे आदी उपस्थित होते.
प्रा. शीतल कांबळे यांनी प्रास्ताविक; तर प्रा. ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. पूजा चिंचवडे यांनी आभार मानले.