एआयची यंत्रणा करा - वनमंत्री नाईक
बेल्हे, ता. १२ : ‘बिबट्याच्या हालचाली निदर्शनास येण्यासाठी पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात उपग्रह आधारित इंटरनेट जोडणी असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या(एआय) माध्यमातून सायरन वाजतो, अशी यंत्रणा करण्याचे आदेश दिले आहेत’, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. बेल्हे (ता. जुन्नर) येथे एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमानिमित्त वनमंत्री नाईक आले होते, त्यावेळी त्यांनी जुन्नर तालुक्यातील बिबट्याच्या समस्येसंदर्भात लोकांशी संवाद साधला. वनमंत्री नाईक म्हणाले, ‘‘पूर्वी जुन्नर तालुक्यात धरणे नव्हती. आता धरणे झाल्याने उसाची लागवड झाली आहे. यामुळे बिबट्याला परिपूर्ण जीवन जगण्याची स्थिती शेतीच्या माध्यमातून झाली. इकडे वनखात्याचे क्षेत्रफळ नगण्य असून, बिबट्याचा अधिवास आता उसाचे शेत झालेला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी एक हजार पिंजरे तयार करण्याचा निर्णय झाला आहे.’’

