अवसरीतील कार्यालयातून ‘डीजे’च्या मशनरींची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवसरीतील कार्यालयातून
‘डीजे’च्या मशनरींची चोरी
अवसरीतील कार्यालयातून ‘डीजे’च्या मशनरींची चोरी

अवसरीतील कार्यालयातून ‘डीजे’च्या मशनरींची चोरी

sakal_logo
By

पारगाव, ता. ३० : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील यशोदीप गार्डन मंगल कार्यालयाच्या आवारात असलेल्या डीजे व बेंजो ग्रुपच्या रथातील साउंड सिस्टीमच्या इम्पलीफायर व इतर एकूण सहा मशिनरी, असा एकूण सुमारे तीन लाख ६१ हजार रुपये किमतीचे ऐवज चोरट्यांनी वायर तोडून चोरून नेल्या.
यशोदीप गार्डन मंगल कार्यालयाचे मालक संजय चव्हाण व दत्तात्रेय हिंगे यांचा दिनेश डिजिटल स्वरगंधर्व बेंजो ग्रुप डीजे रथ आहे. त्यावर लाखो रुपये किमतीच्या साउंड सिस्टीमच्या मशिनरी बसविल्या आहेत. गुरुवारी (ता. २८) रात्री मंगल कार्यालयाच्या आवारात रथ उभा केला होता. शुक्रवारी सकाळी रथातील साउंड सिस्टमच्या इम्पलीफायर व इतर एकूण सहा मशिनरी, असा एकूण सुमारे तीन लाख ६१ हजार रुपये किमतीचे ऐवज चोरट्यांनी वायर तोडून चोरून नेल्याल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी मंगल कार्यालयाच्या तारेच्या जाळीचे कुंपण कट करून कार्यालयामध्ये प्रवेश करून चोरी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00479 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top