लोणी येथील अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी येथील अपघातात
दुचाकीवरील तिघे जखमी
लोणी येथील अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी

लोणी येथील अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी

sakal_logo
By

पारगाव, ता. ३० : लोणी (ता. आंबेगाव) येथे बेल्हे-जेजुरी महामार्गावर खडकवाडी फाटा (चिमटा) येथे शुक्रवारी (ता. २९) दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मोटार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. अपघातानंतर मोटार रस्त्याकडेला असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली.
इरटिका मोटार (क्र. एम.एच. १४ एच.के. ५२३९) लाखणगाववरून खडकवाडी-लोणीमार्गे चाकणला चालली होती. तर, दुचाकी (क्र. एम.एच १४ डब्लू-१५२०) लोणीवरून खडकवाडीला चालली होती. लोणी-खडकवाडी रस्त्यावर चिमटा येथील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकलवरील मीना रामदास सुक्रे, अभिषेक सुक्रे व जयश्री करंडे हे तिघे जखमी झाले.
दरम्यान, या रस्त्यावरून जात असलेले नामदेव सुक्रे यांनी जखमींना त्वरित उचलून लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. इरटिका मोटारीमध्ये दोन जण होते. मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकली. मोटारीमधील दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00480 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top