रस्त्यावर फांदी पडल्याने वाहतूक विस्कळित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर फांदी पडल्याने वाहतूक विस्कळित
रस्त्यावर फांदी पडल्याने वाहतूक विस्कळित

रस्त्यावर फांदी पडल्याने वाहतूक विस्कळित

sakal_logo
By

पारगाव, ता. ६ : पारगाव (ता. आंबेगाव) ते लोणी रस्त्यावरील धामणीखिंड येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडल्याने काही वेळ रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, सरपंच सागर जाधव यांनी तत्परता दाखवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाडाची फांदी बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

या वेळी येथून जात असलेले पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व सरपंच जाधव यांना या बाबत अवगत केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रथमेश लोंढे, विजय आघाव, राहुल हेमके, केरभाऊ बढेकर, संजय बढेकर, बंटी जाधव यांनी जेसीबीच्या साह्याने फांदी बाजूला करून रस्ता मोकळा केला.

धामणीखिंड (ता. आंबेगाव) : फांदी रस्त्यातून बाजूला करताना कर्मचारी.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00488 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top