म्हाळसाकांत योजना कुकडी प्रकल्पात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळसाकांत योजना कुकडी प्रकल्पात
म्हाळसाकांत योजना कुकडी प्रकल्पात

म्हाळसाकांत योजना कुकडी प्रकल्पात

sakal_logo
By

पारगाव, ता. ४ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील दुष्काळीभाग म्हणून ओळख असलेल्या लोणी धामणी परिसराला वरदान ठरणाऱ्या म्हाळसाकांत सिंचन योजना आता प्रत्यक्षात साकारणार असून, या योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याबाबत सर्वेक्षणास मान्यता दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
लोणी धामणी परिसरातील पहाडदरा, शिरदाळे, धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, खडकवाडी, रानमळा या गावातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटत गेल्याने या परिसरात तीन-चार वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतात फक्त खरीप हंगामातील पीक घेता येते. इतर वेळी शेत कोरडी पडलेली असतात. शेतात काम नसल्याने या भागातील महिला दररोज वाहनातून दूर अंतरावरील बागायती क्षेत्रातील शेतात कामासाठी जातात. या परिसरातील शेतीसाठी शाश्वत सिंचन योजना व्हावी, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व या भागाचे जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत होते.

मंत्रालयातील बैठकीत गती
या योजनेसंदर्भात मंत्रालयात ३० नोव्हेंबर २०२१ रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली होते. त्यावेळी बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, डिंभे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. गा. सांगळे, विवेक वळसे पाटील व या परिसरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिकांच्या आशा पल्लवित
या बैठकीत लोणी धामणी परिसरातील टंचाईग्रस्त गावांसाठी प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सूचना केली होती. मंत्री जयंत पाटील यांनी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे त्यावेळी निर्देश दिले होते. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने म्हाळसाकांत योजनेला गती मिळाली होती. त्यानुसार २८ एप्रिलला जलसंपदा विभागाने प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याबाबत सर्वेक्षणास तत्त्वतः मान्यता दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00491 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top