लोणीनजीक दोन अपघातांत वाहनांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणीनजीक दोन अपघातांत वाहनांचे नुकसान
लोणीनजीक दोन अपघातांत वाहनांचे नुकसान

लोणीनजीक दोन अपघातांत वाहनांचे नुकसान

sakal_logo
By

पारगाव, ता. ७ : बेल्हे ते जेजुरी महामार्गावर लोणी गावच्या हद्दीत बांधन वस्ती येथे इनोव्हा कारने घराच्या भिंतीला जोराची धडक दिल्याने भिंतीला भगदाड पडले. याच रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर खडकवाडी जवळील पैसा गलठा वस्ती येथे घरासमोरील शेडला पिकअपने धडक दिली. दोन्ही अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

बांधन वस्ती येथील अपघातातील धडक एवढी जोरदार होती की घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले. गाडीमध्ये चारजण होते. एअर बॅग असल्याने चौघांना किरकोळ दुखापत झाली.अपघाताचे वृत समजताच पोलिस पाटील संदीप आढाव, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी अपघातस्थळी धाव घेतली व जखमींना तत्काळ लोणी येथील दवाखान्यात दाखल केले. याच सुमारास या रस्त्यावर खडकवाडी जवळील पैसागलठा वस्ती येथे घरासमोरील शेडला पिकअपने धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र पत्र्याच्या शेडचे व वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपघातग्रस्त ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी लोणीचे माजी सरपंच सावळेराम नाईक व खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00499 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top