लोणी येथे दुचाकीची चोरी, खताच्या दुकानावरही डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी येथे दुचाकीची चोरी,
खताच्या दुकानावरही डल्ला
लोणी येथे दुचाकीची चोरी, खताच्या दुकानावरही डल्ला

लोणी येथे दुचाकीची चोरी, खताच्या दुकानावरही डल्ला

sakal_logo
By

पारगाव, ता. ९ : लोणी (ता. आंबेगाव) येथे घरासमोर उभी असलेली मोटारसायकल गुरुवारी (ता. ५) चोरट्याने पळवून नेली. तसेच, गावातील खते औषध विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडले असून, गल्ल्यातील रक्कम लांबवली.
लोणी येथील बांधनवस्ती येथे लोणी-पाबळ रस्त्यालगत संतोष यशवंत पडवळ यांचे घर आहे. त्यांनी गुरुवारी रात्री घरासमोर हिरो कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच १४ जेक्यू ६८५४) हॅण्डल लॉक करून लावली. मात्र, शुक्रवारी सकाळी झोपेतून उठले असता घरासमोरील मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
त्याच दिवशी गावातील बेल्हे-जेजुरी रस्त्यालगत असलेले जयेश तानाजी वाळुंज यांच्या ‘मोरया फर्टिलायझर या खते-औषध विक्रीच्या दुकानाचा मागील बाजूचा पत्रा उचकटवून चोरट्याने गल्ल्यातील सुमारे चार ते पाच हजार रुपयांची चिल्लर व सुट्टे पैसे लांबविले.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00500 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top