
लाखणगावच्या शेतकऱ्यांकडून श्रीराम गोशाळेस मोफत चारा
पारगाव, ता. ११ : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी डॉ. ज्ञानदेव वाळूंज व अरुण मुंगसे यांनी आपल्या शेतातील पिकअप टेम्पो भरून हिरवा चारा मंचर येथील गो अमृत सेवा संघाच्या जय श्रीराम गोशाळेतील (शेवाळवाडी, मंचर) जनावरांना मोफत दिला. यामुळे टंचाईच्या काळात जनावरांची भूक भागण्यास मोठी मदत झाली.
वाढता उन्हाळ्यात चारा तसेच पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा वेळी वाळूंज व मुंगसे यांनी दाखविलेल्या माणुसकीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. चारा कापून तो गाडीत भरण्यापासून मंचर येथे गोशाळेत पोहचवून चारा खाली करण्यापर्यंत बजरंग दलाचे कार्यकर्ते ऋषी वाळूंज, दिनेश मोरे, सागर भोर, गौरव आवटे, विशाल बाणखेले, करण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. बजरंग दलाच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींनी आवाहन करण्यात येत आहे की, कृपया गोसेवेच्या विविध कार्यात पुढे येऊन आपण सढळ हाताने सहकार्य करावे.
00980
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00506 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..