पहाडदऱ्यातील नागरिकांसाठी ''भीमाशंकर''तर्फे पाण्याचा टँकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पहाडदऱ्यातील नागरिकांसाठी ''भीमाशंकर''तर्फे पाण्याचा टँकर
पहाडदऱ्यातील नागरिकांसाठी ''भीमाशंकर''तर्फे पाण्याचा टँकर

पहाडदऱ्यातील नागरिकांसाठी ''भीमाशंकर''तर्फे पाण्याचा टँकर

sakal_logo
By

पारगाव, ता. ११ : पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील नागरिकांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पाण्याचा टँकर सुरू केल्याची माहिती सरपंच राजश्री संतोष कुरकुटे यांनी दिली.
तालुक्याच्या पूर्व भागातील पहाडदरा हे दुर्गम गाव आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या वतीने परिसरासाठी पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला आहे. याबाबत खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, माजी उपसरपंच विलास पडवळ, संतोष कुरकुटे, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र वाघ यांनी पाठपुरावा केला.


00982

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00507 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top