
पारगावात महामार्गाच्या कामास सुरुवात
पारगाव, ता. १४ : पारगाव (ता. आंबेगाव) परिसरातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाचे काम सुमारे चार महिन्यापासून बंद आहे. अपूर्णावस्थेत काम बंद पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच नागरिक व व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. याबाबत ‘सकाळ’ने सातत्याने वृत्त प्रसिध्द केले आहे. शुक्रवार (ता. १३) ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिध्द होताच संबधित ठेकेदाराने शनिवारी दुपारपासून तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अष्टविनायक महामार्गातील रांजणगाव ते ओझर हा महामार्ग पारगावातून जात आहे. या रस्त्याचे काम सुमारे वर्षभरापासून सुरु आहे. भीमाशंकर साखर कारखाना ते घोडनदी पुलापर्यंत असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे काम अनेक महिन्यापासून सुरु आहे त्यासाठी मोठे खड्डे घेण्यात आले. मातीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला तसेच पडून आहेत गटारीचे काम अपूर्णावस्थेत आहे. लोखंडी गज तसेच उभे आहेत त्यामुळे रस्त्याच्या बाजूला दुकाने असणाऱ्या व्यावसायिकांची गैरसोय होत आहे. पावसाळा जवळ आल्याने लवकरात लवकर ही कामे व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. वृत्त प्रसिध्द होताच आता या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00516 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..