
अवसरी बुद्रुकमध्ये संकल्प प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप
पारगाव :अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे बुद्धजयंती व बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी वरळी (मुंबई) येथील सम्यक संकल्प प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमा शिंदे या होत्या. याप्रसंगी उपसरपंच सचिन हिंगे, ग्रामपंचायत सदस्या आशा संजय चव्हाण, गौतम खरात, विठ्ठल टिंगरे, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक माऊली अस्वारे ,ज्योती निघोट, अक्षता शिंदे, जयश्री तांबे, सचिन रोकडे, सम्यक संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास रोकडे, संजीवन फरांदे, संजय कासारे, जयसिंग ताटे, गणेश आंबले, सचिन कळके, विद्या विलास रोकडे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सोनम रोकडे यांनी सूत्रसंचालन तर गौतम रोकडे यांनी आभार मानले.
01014