बारा वर्षाच्या गौरीने जिंकली मने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारा वर्षाच्या गौरीने जिंकली मने
बारा वर्षाच्या गौरीने जिंकली मने

बारा वर्षाच्या गौरीने जिंकली मने

sakal_logo
By

पारगाव, ता. १८ ः आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथील १२ वर्षाच्या गौरी संतोष टाव्हरे या मुलीने बैलगाडा शर्यतीच्या घाटात सुसाट धावणाऱ्या शर्यतीच्या बैलासमोरील घोडीवर बसून सर्वांची मने जिंकली. तिचा घोडीवर बसलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीच्या घाटात गाड्याला बैल जुंपणाऱ्या जुन्नर तालुक्यातील मुलीचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर शर्यतीच्या बैलासमोरील घोडीवर बसून स्वार होण्याचे धाडस गौरी हिने नुकत्याच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर (बेलसरवाडी) येथील बैलगाडा शर्यती केले. आता पुन्हा तिने भोसरी येथील बैलगाडा शर्यतीमध्ये गाड्यासमोरील घोडीवर बसून बैलगाडा शौकिनांची मने जिंकली. गौरी हिला वडिलांप्रमाणेच बैलगाडा शर्यती आवड आहे. या आवडीतूनच तिने वडिलांकडून घोडीवर बसण्याचे प्रशिक्षण घेतले. ‘‘खरेतर घोड्यावर बसून फिरणे फार सोपे आहे, मात्र बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलांच्या पुढे घोडी पळवणे फार अवघड असते. लहान वयात तेही मुलीने बैलगाड्यापुढे घोडी पळवणे हे निश्चित कौतुकास्पद आहे,’’ असे सरपंच उत्तम टाव्हरे यांनी सांगितले.

ID: AMG22B01019

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00527 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top