रोडेवाडी फाटा येथे बसविले गतिरोधक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोडेवाडी फाटा येथे बसविले गतिरोधक
रोडेवाडी फाटा येथे बसविले गतिरोधक

रोडेवाडी फाटा येथे बसविले गतिरोधक

sakal_logo
By

पारगाव, ता. २४ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून गेलेल्या बेल्हे-जेजुरी महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील रोडेवाडी फाटा येथील चौकाच्या चारही बाजूला रस्त्यावर गतिरोधक बसवावे, अशी मागणी अनिल वाळुंज यांनी केली होती. या मागणीची दखल घेत रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तातडीने चारही बाजूंना गतिरोधक बसवले आहेत.

येथील रस्त्यांची कामे झाल्यामुळे या ठिकाणी रहदारी वाढली आहे. परिणामी, येथे दोन दिवसांपूर्वी एक भयानक अपघात झाला. त्यामुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत होती. या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसविले गेल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00536 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top